मायबापा ..... मायबापा .....
माणूस होऊन जगणे थोडे जगून पहा
देवपणा तू सोडून खाली उतर जरा
मायबापा ..... मायबापा .....
तू नसल्याचा भास पसरला चहुकडे
दगडमातीच्या भिंतींमधुनी विहर जरा
मायबापा ..... मायबापा .....
सुखदु:खाचे झाले आता गाव जुने
त्या हसण्या-रडण्यामाधुनी तू बहर जरा
मायबापा ..... मायबापा .....
या जगण्यातून काढून घे हे जहर जरा
उलट जरासा दु:खाचा हा प्रहर जरा
मायबापा ..... मायबापा .....
रडता रडता या ओठांवर कधितरी
हसण्याचाही कर जरासा कहर जरा
मायबापा ..... मायबापा .....
अंगण होईल देव्हाऱ्यासम पावन हे
वेलिवरल्या पानाफुलातून डवर जरा
मायबापा ..... मायबापा .....रें..... मायबापा .....
(less info)
Star Trek - The original series
Visit ..
http://www.youtube.com/user/Tu
.
Thanks.. Satyajit Bandkar..
Har har mahadev
jar shakya asel tar raja shvchatrapati complete upload kara...plz.